1. या उन्हाळ्यात जबाबदाऱ्यां ...

या उन्हाळ्यात जबाबदाऱ्यांपासून थोडा ब्रेक घ्या : मॉमसाठी परफेक्ट सुट्टयांची प्लॅनिंग!

All age groups

Sanghajaya Jadhav

2.8K दृश्ये

10 hours ago

या उन्हाळ्यात जबाबदाऱ्यांपासून थोडा ब्रेक घ्या : मॉमसाठी परफेक्ट सुट्टयांची प्लॅनिंग!
लसीकरण
Travelling with Children

आई होणे म्हणजे केवळ जबाबदाऱ्या सांभाळणे नाही, तर स्वतःच्या गरजा ओळखून त्यासाठी वेळ काढणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही दिवसभर मुलांची काळजी घेत असता, त्यांचे टिफिन तयार करत असता, शाळेचे, अभ्यासाचे, घरकामाचे ओझे वाहत असता. पण स्वतःसाठी वेळ काढणेही गरजेचे आहे. म्हणूनच, तुम्हाला सुट्टी घ्यायची असल्यास, ती तुमच्या गरजा, पसंती आणि मानसिक शांती लक्षात घेऊन निवडली पाहिजे. त्यामुळेच, या उन्हाळ्यात स्वतःसाठी थोडा वेळ द्या आणि एक छोटीशी सुट्टी प्लॅन करा.

Advertisement - Continue Reading Below

1. सोलो ट्रिप – स्वतःला नव्याने शोधण्याची वेळ

More Similar Blogs

    जर तुम्हाला शांतता, एकांत आणि स्वतःच्या विचारांसोबत थोडा वेळ घालवायचा असेल, तर सोलो ट्रिप तुमच्यासाठी परफेक्ट आहे. हे ठिकाण निसर्गरम्य असू शकते, जिथे तुम्ही ध्यानधारणा करू शकता, स्वतःसाठी वेळ देऊ शकता आणि एक नवीन ऊर्जा घेऊन घरी परतू शकता.
    उदाहरणार्थ: ऋषिकेश, गोवा, केरळ, लडाख, किंवा कोणतेही नैसर्गिक ठिकाण

    2. फॅमिली ट्रिप – नातेसंबंध घट्ट करण्यासाठी

    मुलांसोबतची सुट्टी म्हणजे केवळ प्रवास नाही, तर त्यांच्यासोबत घालवलेला आनंददायी वेळ. फॅमिली ट्रिपमध्ये सर्वांचा आनंद लक्षात घेऊन प्लॅन करा. तुम्ही थीम पार्क, जंगल सफारी, समुद्रकिनारा किंवा ऐतिहासिक ठिकाणे निवडू शकता.
    सर्वोत्कृष्ट ठिकाणे: उदयपूर, महाबळेश्वर, दार्जिलिंग, जयपूर, अंदमान

    3.स्पा आणि वेलनेस रिट्रीट – स्वतःला रिचार्ज करण्यासाठी

    जर तुम्ही स्ट्रेसमुळे थकले असाल आणि शरीर-मन शांत करण्याची गरज असेल, तर वेलनेस रिट्रीट सर्वोत्तम पर्याय आहे.
    योग्य ठिकाणे: केरळ आयुर्वेदिक रिट्रीट, कूर्ग हिल स्टे, हिमालयन वेलनेस सेंटर

    4. फ्रेंड्स ट्रिप – आई पण व्यक्ती म्हणून

    आई म्हणून जबाबदाऱ्या सांभाळताना आपण स्वतःला विसरतो. जुन्या मैत्रिणींसोबतची मजा, कॅफेमध्ये गप्पा आणि बिंधास्त फिरणे याने मन ताजेतवाने होते.
    सुपर ठिकाणे: गोवा, पाँडिचेरी, कसौली, शिमला

    5. क्लासिक रोड ट्रिप 

    जर तुम्हाला ड्राइव्हिंग आणि साहस आवडत असेल, तर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा एकट्याने रोड ट्रिप करू शकता.
    सर्वोत्कृष्ट रूट्स: मुंबई-गोवा, दिल्ली-लेह, बंगळुरू-ऊटी

    आईंसाठी ट्रिप प्लॅनिंग टिप्स

    सर्व प्लॅनिंग आधी करा – मुलांना कुठे सोडायचे, आवश्यक वस्तूंची यादी तयार करा
    बजेट सेट करा – प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी बडबड नको
    आरोग्य आणि सेफ्टी – मुलांसाठी आणि स्वतःसाठी आवश्यक औषधे ठेवा
    गिल्ट फील करू नका – आई म्हणून ब्रेक घेणे गरजेचे आहे

    सुट्टीचा मनमुराद आनंद घ्या – मोबाइल आणि घरच्या जबाबदाऱ्यांपासून थोडा वेळ लांब राहा. स्वतःला प्राधान्य द्या.

    थोड्या वेळाचा ब्रेक घेतल्यावर तुम्ही फ्रेश वाटाल आणि पुन्हा उर्जेने जबाबदाऱ्या पार पाडाल. त्यामुळे, आई म्हणून स्वतःसाठी वेळ काढा आणि एक परफेक्ट सुट्टी प्लॅन करा! आई होणे म्हणजे तुमचे अस्तित्व विसरणे नव्हे, तर ते अधिक सुंदर बनवणे. योग्य सुट्टी निवडा आणि नव्या उत्साहाने घरी परत या! 

    Be the first to support

    Be the first to share

    support-icon
    Support
    bookmark-icon
    Bookmark
    share-icon
    Share

    Comment (0)