1. तुमचे मूल अन्न खाण्यास न ...

तुमचे मूल अन्न खाण्यास नकार देत ? जानूया खाऊ घालण्याच्या मजेदार ५ कुल्प्त्या

All age groups

Sanghajaya Jadhav

2.9M दृश्ये

3 years ago

 तुमचे मूल अन्न खाण्यास नकार देत ? जानूया खाऊ घालण्याच्या मजेदार ५ कुल्प्त्या

Only For Pro

blogData?.reviewedBy?.name

Reviewed by expert panel

Dr. Narmada Ashok

नियमित टिप्स
वाढीसाठी अन्न
आहाराच्या सवयी
आहार योजना
आहार जो टाळावा
खाण्याची टाळाटाळ

आई या नात्याने, तुम्हाला हे माहित असलेच की बाळाला खायला घालणे सर्वात आव्हानात्मक गोष्ट असते कारण मुले खाताना जास्तीत जास्त मस्ती, राग आणि नखरा दाखवतात. जर मुलाचा मूड ठीक असेल तर तो भरपेट जेवण करतो,पण जर त्याचा खायचा मूड नसेल तर त्याच्यासाठी अनेक बहाणे काढले जातात. जसे मला ते आवडत नाही, मला भूक नाही. जर मुलाने खाण्यास नेहमीच नकार दिला तर मुलाला नक्कीच काहीतरी समस्या असू शकते. जर सतत मुलाला सर्व वेळ काहीच खायचे नसेल, तर तुम्हाला मुलाला खायला देण्याची पद्धत थोडीशी बदलावी लागेल. मूल लहान असेल तर त्याला मारून दपटुन त्याला सांगता येत नाही उलट त्याच्या कलेने सर्व गोष्टी कराव्या लागतात.आश्या वेळी हे समजून घेणं गरजेचं आहे पालकांना कि मुलांना आणखी काही प्रेम आणि वेळ देण्याची गरज आहे.
तसेच काही वेळा मुलाला चॉकलेट, चिप्स, केक इत्यादी बाहेरील खाद्यपदार्थांचेही व्यसन लागते. त्यामुळेच मुलाला घरचे जेवण आवडत नाही. जर तुमच्या मुलाने घरी जेवायला नकार दिला तर दररोज मुलांना बाहेरचे काहीही न देण्याचा प्रयत्न करा. चला तर मग जाणून घेऊया काही मजेशीर मार्ग ज्यांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या मुलाची अन्न खाण्याची काकू करण्याची सवय कमी करू शकता.

जर मुलाने अन्न खाण्यास नकार दिला तर हे मजेदार मार्ग करून बघा

More Similar Blogs

    १) लक्षात घ्या की मुलासाठी कोणतीही समस्या नाही :

    एका वर्षाच्या बाळाचे सर्व पुढचे दात आलेले आसतात. बाळ  १४-१५ महिन्यांचे झाल्यावर मुलांना  दाड येऊ लागते. अनेक वेळा पालकांना हे कळत नाही की मुलाला आतून वेदना होत आहे. आणि जबरदस्तीने अन्न द्यायला सुरुवात करा. अशावेळी मुलाला अन्न खाताना खूप त्रास होतो, जर मुल अन्न खात नसेल तर त्याला रव्याची खीर पातळ, लापशी, पातळ खिचडी इ. देऊ शकतात. 

    २) खेळात प्रोत्साहन द्या:

    तुम्ही मुलासोबत खेळून अधिक प्रोत्साहन देऊन मुलाला संपूर्ण जेवण पूर्ण करायला लावू शकता. तुम्ही मुलासाठी कविता किंवा लहान मुलांचे गाणे देखील म्हणु शकता. जेणेकरून मुल आनंदाने हसेल आणि तुमचे ऐकेल. जेव्हाही मुल दूध किंवा अन्न पूर्ण करेल, तेव्हा त्यांना अभिनंदन, चांगले बाळ असे शब्द सांगा जेणेकरून ते तुमचा मुद्दा आणखी लक्षात ठेवतील. अशा प्रकारे तो तुमच्या प्रेमाच्या लालसेपोटी पौष्टिक आहाराचा आस्वाद घेईल.

     ३) मुलासोबत बसून तुमच्याच ताटात त्याच अन्न ठेवा:

    तुम्ही तुमच्या मुलासोबत बसूनच अन्न खा आणि लहान मुलाला म्हणा की मी खातो तसे तू खा. मुलं बघून खूप लवकर शिकतात. आणि तुम्हाला दिसेल की ही युक्ती तुमच्यासाठी नक्कीच काम करेल आणि हळूहळू तुमचे मूल स्वतःच अन्न खाण्यास सुरुवात करेल. असे केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुमची समस्याही दूर होईल.

    ४) अशी भांडी आणा, ज्यामध्ये कार्टून बनवले जातात:

     आजकाल वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्यांबरोबरच मुलांना खूश करण्यासाठी विविध प्रकारची भांडीही बाजारात येतात. मुले त्यांना पाहून खूप आनंदित होतात. तुमच्या मुलांना खायला घालण्यासाठी तुम्ही त्यांची मदत देखील घेऊ शकता. तुम्ही त्यांना फळे, अन्न, पाणी इत्यादी द्या, मग बघा तुमच्या मुलाला आनंद होईल आणि त्यालाही अन्न खाण्यात मजा येईल.

    ५) इतर मुलांबरोबर खायला द्या:

    जर तुमच्या घरात जास्त मुले असतील तर त्यांना एकाच वेळी खायला द्या. आणि जर सर्व मुले स्वतःच खातात, तर तुमचे मूल देखील त्यांना पाहून खाण्याचा प्रयत्न करेल. यामुळे तुमच्या बाळाला हळूहळू अन्न खाण्याची सवय होईल आणि तो स्वतःच खायला सुरुवात करेल. यासोबतच तुम्ही त्यांना जेवण लवकर संपवायला प्रोत्साहन द्यायला हवं आणि चांगलं कसं खायचं हेही शिकवलं पाहिजे.

    • त्यामुळे या काही टिप्स आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या मुलाची दुर्लक्ष करण्याच्या सवयीपासून मुक्त होऊ शकता.
    • मूल एका दिवसात ते शिकेल असे नाही, सुरुवातीला तुमच्या मुलाला त्रास होऊ शकतो.
    •  जर तुम्ही तुमच्या बाळाला नियमितपणे असे खाऊ घालण्याचा प्रयत्न केला तर तो नक्कीच शिकेल.
    •  मुलाकडे कधीही हट्ट करू नका, कारण हट्टीपणामुळे मुलेही चिडचिड करतात आणि नंतर मुद्दाम जेवत नाहीत.

    तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.

    Be the first to support

    Be the first to share

    support-icon
    Support
    bookmark-icon
    Bookmark
    share-icon
    Share

    Comment (0)