मुलांसाठी संतुलित आहार तक ...
Only For Pro
Reviewed by expert panel
मुलांसाठी संतुलित आहार आवश्यक आहे, कारण हे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी महत्वाचे आहे. मुले खूप खेळतात त्यामुळे त्यांची ऊर्जा कमी लगेच होते व लहान मुले वाढीस लागलेले असतात त्यामुळे त्यांना योग्य प्रमाणात पोषक आहार घेणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलांना प्रथिनेयुक्त पौष्टिक पदार्थ खायला देण्याचा विचार करणे गरजेचं आहे. म्हणूनच, मुलांसाठी संतुलित आहार चार्ट पाळणे आवश्यक आहे.खालील चार्ट मुलांच्या वयाच्या आणि पौष्टिक गरजांच्या आधारावर तयार केलेला आहे. हा आहार चार्ट १ ते १२ वयोगटातील मुलांसाठी आहे.
महत्वाचे मुद्दे
मुलांसाठी संतुलित आहार चार्ट पाळणे आवश्यक का आहे हे जाणून घेऊया या महत्वाच्या मुद्द्यानी!!
मुलांसाठी संतुलित आहार म्हणजे काय?
संतुलित आहार म्हणजे शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य प्रमाणात आणि गुणोत्तरांमध्ये विविध प्रकारचे अन्न समाविष्ट केले जाते. मुलांसाठी संतुलित आहाराचे पालन करणे विशेषतः महत्वाचे आहे कारण यामुळे मधुमेहाचा एकूण धोका कमी होतो, मेटाबॉलिक सिंड्रोम विकसित होण्याची शक्यता कमी होते आणि बालपणातील कर्करोगाचा धोका कमी होतो.
मुलांसाठी संतुलित भारतीय आहार चार्ट:
मूग डाळीचे धपाटे किंवा इडली-सांबार किंवा पोहा किंवा उपमा
दूध (एक ग्लास) किंवा फळांचा रस (सुरवातीच्या वयातील मुलांसाठी)
मधला नाश्ता (१०:००-१०:३०)
फळ (संत्रा, सफरचंद, केळी, पेरू, इ.)
अक्रोड किंवा बदाम (थोडेसे)
वरण भात ,चपाती किंवा पराठा
भाजी (सिझनल भाज्या - गवार ,तोंडली ,लालमाठ ,पालक, मेथी, गाजर, फ्लॉवर, इ.)
डाळ (मसूर ,तूर, मूग, चणा, इ.)
भात (ब्राउन राईस किंवा साधा राईस)
दही किंवा रायता
कोशिंबीर/सालाड (टोमॅटो, काकडी, गाजर, इ.)
मूग डाळीचे लाडू किंवा मखाने किंवा फळ
मसाला दूध किंवा बटर मिल्क
खिचडी ,चपाती किंवा पराठा
भाजी (ब्रोकली, बीन्स, पनीर भाजी)
डाळ (मसूर, तूर, इ.)
भात
सालाड
दूध (एक ग्लास)
काही महत्वाच्या गोष्टी:
अतिरिक्त टिपा:
विविधता: मुलांच्या आहारात विविधता ठेवा म्हणजे त्यांना सर्व पोषक घटक मिळतील.
हेल्दी स्नॅक्स: पॅक्ड स्नॅक्स टाळा आणि घरी बनवलेले हेल्दी स्नॅक्स देऊ करा.
मुलांसाठी संतुलित आहार चार्ट राखण्यासाठी टिपा
खाद्यपदार्थांची मर्यादा
मुलांच्या संतुलित आहार चार्टमध्ये फास्टफूड तसेच प्रोसेस असे खाद्यपदार्थ नसावेत. . आपल्या मुलाला यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. तथापि, बालरोगतज्ञांचा सल्ला घेणे आणि आपण आपल्या मुलास जे आहार देता ते त्यांच्यासाठी योग्य आहे किंवा त्यांना कोणतीही ऍलर्जी असल्यास याची खात्री करणे महत्वाचे आहे.
नियमित व्यायाम आणि शारीरिक क्रियाकलाप महत्वाचे आहेत. खेळ, सायकलिंग, आणि इतर शारीरिक क्रियाकलाप यांचा समावेश करा.
हा संतुलित आहार चार्ट मुलांच्या पोषण गरजांची काळजी घेऊन तयार केलेला आहे. प्रत्येक मुलाची गरज वेगवेगळी असते, त्यामुळे हा चार्ट त्यांच्या आवडीनुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अंमलात आणावा.
Be the first to support
Be the first to share
Comment (0)