1. या गणपतीच्या सुट्टीत म ...

या गणपतीच्या सुट्टीत मुलांसोबत प्रवास करताय? ५ आवश्यक प्रवास टिपा

All age groups

Sanghajaya Jadhav

2.6M दृश्ये

2 years ago

   या गणपतीच्या सुट्टीत मुलांसोबत प्रवास करताय? ५ आवश्यक प्रवास टिपा
Travelling with Children

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणोशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांनी तयारी सुरू केली आहे. मात्र, यंदा गणेशोत्सवावर करोनाचे सावट कमी असल्यानं प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना ह्या वर्षी  मुंबई, पुण्यातून जाणाऱ्यांना टोलमाफी आणि जास्त बसेस पाठवल्या जाणार आहे अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलीय. करोनाचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. आपला मुलांसोबतचा प्रवास मजेशीर आणि रोमांचक असतो. सद्यपरिस्थिती पाहता महाराष्ट्रात धो धो पाऊस बरसतोय मग अश्या पावसाळ्यात सर्रासपणे पसरणाऱ्या रोगांपासून मुलांचे त्यांचे संरक्षण करणे पालकांचे परम कर्तव्यं आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेत असताना त्यांना प्रवासात मजा कशी करता येईल ? याबाबत काही टिप्स आम्ही तुम्हाला या ब्लॉग मध्ये देत आहोत. 

  • पावसाळ्यात प्रवास करताना तुम्ही तुमच्या मुलांशी प्रॅक्टिकल /व्यवहारी असले पाहिजे.
  • त्यांना मजा करण्याची परवानगी तर द्याच पण काही नियमही त्यांना पाळायला सांगा त्याच्या कडून हे सर्व करताना त्यांना नियंत्रणात ठेवणे थोडे कठीण आहे पण खबरदारी हाच सोपा पर्याय आहे नाही का!!
  • तसेच, ते आजारी पडणार नाहीत याची खात्री करणे ही देखील एक महत्त्वाची प्राथमिकता आहे. तुम्ही सुट्टी घालवताना तुमच्या मुलांवर सतत लक्ष नाही देऊ शकत परंतु त्यांना लावलेल्या चांगल्या सवयी त्या नक्कीच तुमची मदत करतील. 

More Similar Blogs

    पावसाळ्यात लहान मुलांसोबत ५ प्रवास टिप्स

    १. प्रथमोपचार किट सोबत घ्या 
    पावसाळ्यात आजार हे सर्वत्र आणि सर्रास होतात. म्हणून, या हंगामात आपल्या मुलांसोबत प्रवास करताना, त्यांना आजारांपासून वाचवण्यासाठी खबरदारी घ्या. यात त्यांना ताप , सर्दी , खोकला आणि जुलाब  संरक्षण करणे समाविष्ट आहे. या प्रवासात तुमच्यासोबत लहान प्रथमोपचार किट आसू द्या. पावसाळ्यात मुलांसाठी प्रथमोपचार किट पॅकिंगची ही महत्त्वाची टीप आयुष्य वाचवणारी ठरेल. आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक अँटीबायोटिक्स हातात ठेवा. तुमच्या मुलांमध्ये आजाराची लक्षणे लवकर दिसून येत असल्यास त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही आठवडाभराच्या सुट्टीवर जात असाल तर बाहेर जाण्यापूर्वी तुमच्या मुलांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

    २. मच्छर प्रतिबंधक 
    पावसाळ्यात डेंग्यूसारखे भयंकर आजारही पसरतात. पावसाळ्यात लहान मुलांसोबत प्रवास करताना सोबत ठेवण्यासारख्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक मच्छर प्रतिबंधक आहे. मलेरियाच्या लक्षणांसाठी तुमच्या मुलांना तपासा, ज्यात ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे किंवा हलकी थंडी यांचा समावेश आहे. बाहेर पाऊस पडत असेल तर त्यांना घरातच राहायला सांगा. 

    ३. स्वच्छता 
    अन्न जंतू आणि पावसाळ्याशी संबंधित रोगांचे वाहक असू शकते. दूषित अन्न आणि पाणी हा पावसाळ्यातील खरा धोका आहे. त्यामुळे आपल्या मुलांना स्वच्छतेबद्दल समजावून सांगा त्यामुळे किती रोगांना प्रतिबंध बसतो तेही समजावा तुम्ही ज्या ठिकाणी सुट्टी घालवत आहात त्या ठिकाणचे स्थानिक खाद्यपदार्थ मुलांना खाण्यासाठी टाळा. मुलांसाठी मान्सूनच्या प्रवासातील ही एक उत्तम टिप्स आहे ज्याचे तुम्ही काटेकोरपणे पालन केले पाहिजे. ते स्वच्छ रेस्टॉरंटमध्ये खातात याची खात्री करा. 

    ४. पहेराव महत्त्व
    पावसाळ्यात किंचितशी थंडीही वाजत असते त्यामुळे मुलांना उबदार आणि फुल्ल बाह्यांचे कपडे परिधान करा. तुमच्या मुलांसोबत प्रवास करताना, त्यांनी लांब पँट आणि लांब बाही असलेले शर्ट देखील घालण्याची खात्री करा. जर तुमच्याकडे लहान मुलगी असेल तर तिला देखील पॅंट घाला. यामुळे त्यांच्यावर डास आणि इतर कीटकांचा हल्ला होण्यापासून बचाव होईल. तसेच, खुल्या पायाच्या सँडलच्या तुलनेत बंद शूज हा उत्तम पर्याय आहे. 

    ५. वेळेचे नियोजन 
    वेळा पाळा , वेळेनुसार प्रवास करा नाहीतर बस ,रेल्वे निगुन जाईल किंवा पुढे ट्रॅफिक लागू शकते आणि तुमचे पुढचे प्रोग्रॅमही खोडमळतात. वेळेच्या नियोजनाने तुम्ही ठरलेल्या वेळेत काम आटपून परत याल आणि तुम्हास तुमच्या पाल्यास दगदगही नाही होणार. पावसाळ्यातील आजारांपासून मुलांचे संरक्षण करताना त्यांना आरामदायी वाटणे महत्त्वाचे आहे. मुलांसोबत प्रवास करताना हे सुरक्षा उपाय त्यांना आजारी पडण्यापासून रोखतील. 

    तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर नक्कीच इतर पालकांसोबत शेअर करा.

    Be the first to support

    Be the first to share

    support-icon
    Support
    bookmark-icon
    Bookmark
    share-icon
    Share

    Comment (0)