1. मुलाला अन्न कसे चावून खा ...

मुलाला अन्न कसे चावून खावे ते शिकवा? ७ प्रभावी टिप्स

All age groups

Sanghajaya Jadhav

3.2M दृश्ये

3 years ago

 मुलाला अन्न कसे चावून खावे ते शिकवा? ७ प्रभावी टिप्स

Only For Pro

blogData?.reviewedBy?.name

Reviewed by expert panel

Huda Shaikh

नियमित टिप्स
विकासात्मक टप्पे
वाढीसाठी अन्न
आहाराच्या सवयी
आहार योजना
आहार जो टाळावा
खाण्याची टाळाटाळ

पालक होणं म्हणजे एक मोठी जबाबदारी ती योग्य पद्धतीने निभवणे तितकच कठीण. आपल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आहार आवश्यक आहे. त्याशिवाय जीवन शक्य नाही. पण अन्न नीट खाणे फार महत्वाचे आहे. असे म्हणतात एक घास ३२ वेळा चावून खावा. कारण अन्न चावताना त्यासोबत तयार होणारी लाळ जेवण पचायला मदत करते. अनेक पालक अनेकदा तक्रार करतात की त्यांचे मूल अन्न नीट खात नाही. येथे हे समजून घेणे फार महत्वाचे आहे की मूल सर्वकाही स्वतःहून शिकत नाही, चांगल्या सवयींप्रमाणे त्याला अन्न खाण्याचे तंत्र शिकवावे लागते.
जर मूल अन्न नीट खात नसेल, म्हणजे चावून खात नसेल, तर फायद्याऐवजी नुकसानही होऊ शकते. जर तुम्ही पालक असाल तर मुलाला अन्न चावून चावून खाणे किती महत्त्वाचे आहे हे सांगणे तुमच्यासाठी गरजेचं आहे. येथे आम्ही अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही मुलाला अन्न चघळून कसे खावे हे शिकवू शकता.

मुलाला अन्न कसे चावून खावे ते शिकवा

More Similar Blogs

     

    १) ८-९ महिन्यांपासून, बाळ बसू लागते. या अवस्थेत आल्यावर त्याला गरमागरम खिचडी, दलिया, रवा खीर वगैरे खायला द्या. यामुळे तो हळूहळू अन्न खायला शिकेल.

    २) ७व्या महिन्यापासून बाळाला पातळ पुरीऐवजी जाड पुरी खाऊ घाला. यामुळे त्याला गिळणे कठीण होईल आणि तो चावून चावून खाण्याचा प्रयत्न करेल.

    ३) १-२ वर्षांची मुले अन्न चावून खाण्याच्या बाबतीत खूप नखरे करतात. जे अन्न चांगले नाही ते न खाण्याच्या बहाण्याने ते गिळतात. ते अन्न विष्ठा म्हणून बाहेर पडते. अशा परिस्थितीत मुलाला तोंड हलवून स्वतःच चावून (चघळण्यास) खाण्यास प्रोत्साहित करा.

    ४) आपल्या मुलाला शक्य तितक्या लवकर आपल्या स्वत: च्या हातांनी खायला शिकवणे त्याच्यासाठी आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. त्यासाठी त्याच्या हातात रोटी, पराठा आणि इतर मऊ पदार्थ देऊ शकता. तो थोडे चावून खाईल. हे त्याला चर्वण शिकण्यास मदत करेल.

    ५) बरेचदा असे दिसून येते की मूल अन्न तोंडात ठेवून घाल फुगवून खाली बसते. अशा स्थितीत मुलासमोर स्वतः खायला सुरुवात करा.याचे अनुकरण करताना बाळ चघळण्यास सुरवात करेल.

    ६) याशिवाय, अन्न लहान भागांमध्ये विभागून घ्या. एकाच वेळी अन्न भरू नका. लहान मुलांची तोंडे लहान असतात, एकाच वेळी जास्त दिल्याने ते चघळण्यास असमर्थ ठरतात.
    ७) जर मूल अन्न तोंडात ठेवून चावत नसेल तर त्याला यम-यम म्हणायला सांगा. जेव्हा तो हा शब्द उच्चारतो तेव्हा त्याच्या तोंडात हालचाल होईल आणि हालचाल चघळण्याचे काम करेल.
    वर नमूद केलेले उपाय नक्की करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे कळवा.

    तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.

    Be the first to support

    Be the first to share

    support-icon
    Support
    bookmark-icon
    Bookmark
    share-icon
    Share

    Comment (0)