1. अतिसार रोग लक्षणे, कारणे ...

अतिसार रोग लक्षणे, कारणे आणि टाळण्यासाठी उपाय

All age groups

Sanghajaya Jadhav

2.3M दृश्ये

3 years ago

अतिसार रोग लक्षणे, कारणे आणि टाळण्यासाठी उपाय

Only For Pro

blogData?.reviewedBy?.name

Reviewed by expert panel

Dr Veethika Kapur

वाढीसाठी अन्न
आहाराच्या सवयी
आहार जो टाळावा
पाणी

उन्हाळा सुरु झाला की अतिसाराचे रुग्ण घरोघरी आढळतात उन्हाची लाहीलाही त्यात जुलाबा मुळे पेशंट अशक्त होतो वेळीच उपाय योजना रुग्णास बचाऊ शकते म्हणून उन्हाळ्यात आरोग्य काळजी गरजेची चला तर मग आपण या ब्लॉगमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की डायरिया आजाराची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत?

अतिसाराचा धोका 

More Similar Blogs

    अतिसारामुळे अनेक बालकांचा मृत्यू दरवर्षी होत असतो. गेल्या दोन महिन्यांत डायरियाचे २ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र प्रधान आरोग्य सचिवांनी सर्व जिल्ह्यांकडून डायरियाबाबत अहवाल मागवला आहे. शासनाकडून खबरदारी घेतली जात आहे, मात्र गरज आहे की प्रत्येक पालकाने या आजाराबाबत जागरूक राहून आतापासूनच खबरदारी घ्यायला सुरुवात केली पाहिजे.

    अतिसार रोगाची लक्षणे आणि कारणे


    १) उन्हाळा अनेक आजार घेऊन येतो आणि त्यातील एक म्हणजे अतिसार.
    अतिसार म्हणजे लहान मुलांसह वृद्धांनाही या आजाराची लागण होते.

    २) पाणी आणि मिठाच्या कमतरतेमुळे जुलाबाची समस्या उद्भवते.

    ३) हा रोग अन्न ऍलर्जीमुळे किंवा पाण्यात आढळणाऱ्या प्रोटोझोआ, विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या प्रतिक्रियेमुळे देखील होऊ शकतो. 
    ४) अतिसारामुळे पोटाच्या खालच्या भागात दुखणे, पोटात पेटके येणे, उलट्या होणे, ताप येणे आणि शरीरात अशक्तपणा येतो.
    ५) खालील लक्षणांद्वारे अतिसार ओळखा: 

    • एकापेक्षा जुलाब , 
    • ओटीपोटात पेटके,
    •  मळमळ, 
    • ओटीपोटात दुखणे, 
    • डोके दुखणे, 
    • चक्कर येणे, 
    • उलट्या

    अतिसारासाठी घरगुती उपाय
     

    १) डायरिया टाळण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करून पाहू शकता.

    २) एक ग्लास पाण्यात २ चमचे साखर आणि चिमूटभर मीठ आणि लिंबाचा रस मिसळून प्या. त्यामुळे मुलांना तात्काळ आराम मिळेल. 
    ३) नारळ पाणी- डायरियाच्या समस्येवर नारळ पाणी खूप फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यात असलेले पोषक तत्व शरीरातील कमजोरी देखील दूर करतात.

    ४) मसूरचे पाणी- जुलाबाच्या वेळी मुलांना मसूराचे पाणी, तांदळाचे पीठ आणि दही-केळी खाऊ घालू शकता.
    ५) एका जातीची बडीशेप पावडर पाण्यात मिसळून मुलांना दिल्यास जुलाबाची समस्याही दूर होते. 
    ६) डाळिंबाची साल सुकवून चांगली बारीक करून घ्यावी. यानंतर, या पावडरमध्ये मध मिसळा आणि दिवसातून ३ ते ४ वेळा मुलाला द्या.
    ७) अतिसारामुळे होणारे निर्जलीकरण टाळण्यासाठी भरपूर द्रव प्या. उलट्याही होत असतील तर एकावेळी भरपूर पाणी पिण्याऐवजी कमी प्रमाणात पाणी प्यावे.

    ८) या दरम्यान, मुलाला विश्रांती आणि पुरेशी झोप मिळाल्याने आराम मिळेल.
    ९) मसालेदार अन्न टाळा

    १०) मुलाला दोन दिवसांपेक्षा जास्त काळ जुलाब होत असल्यास, पोटात किंवा घशात तीव्र वेदना होत असल्यास, खूप ताप असल्यास त्वरित जवळच्या हॉस्पिटल किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

    तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.

    Be the first to support

    Be the first to share

    support-icon
    Support
    bookmark-icon
    Bookmark
    share-icon
    Share

    Comment (0)