"ओमायक्रॉन BF.7 : महाराष् ...
कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन BF.7 या नव्याने उदभवणारा धोका लक्षात घेता याचा महाराष्ट्रात प्रवेश रोखण्यासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. जी जनतेने कटाक्षाने पाळणे आतिशय गरजेचे आहे कारण नाताळ आणि नवीन वर्षांच्या सुट्टया जाहीर झाल्या आहेत त्यामुळे लोक भटकंती तसेच सामाजिक समारंभास प्राधान्य देताना दिसतील त्यामुळे राज्य सरकारने तज्ज्ञांचा समावेश असलेले टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणाही सरकारने केली. त्याबाबत या ब्लॉग द्वारे सविस्तर जाणून घेऊया.
भारतात ओमायक्रॉन BF.7 चे फक्त चार रुग्ण आढळले आहेत गुजरात आणि ओडिशामध्ये प्रत्येकी दोन. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जनतेला घाबरून न जाता आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे आणि सरकारचे ५ सूत्री धोरण सांगितले.
१. चाचणी
२. ट्रॅकिंग
३. उपचार,
४. लसीकरण
५. कोविड-योग्य वर्तन
या सर्व स्तरांवर पाच-पायरी धोरण राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे असे प्रतिपादन आरोग्य मंत्री यांनी केले.
ओमायक्रॉन BF.7 बद्दल माहिती
सरकारची ओमायक्रॉन (Omicron subvariant BF.7) खबरदारीच्या उपाययोजना
१. आंतरराष्ट्रीय विमानांद्वारे राज्यात येणाऱ्या २% प्रवाशांची थर्मल चाचणी यादृच्छिकपणे करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
२. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मास्क घालणे आवश्यक
३. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
४. नियमांनुसार ५ -१० फूट कोविड अंतर राखणे
५. सर्व नागरी संस्थांना RT-PCR चाचणी वाढवण्याचे निर्देश
६. बूस्टर डोस ड्राइव्हला गती
७. रुग्णालयांना स्टँडबाय मोडवर राहण्याचे निर्देश
८. सर्व स्तरावरील आरोग्य अधिकाऱ्यांना १००% नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग करण्याचे निर्देश
लक्षात ठेवा की कोणतेही उपाय करण्यापूर्वी, तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोरोनाची लक्षणे दिसताच जवळच्या हॉस्पिटल किंवा डॉक्टरांशी संपर्क साधण्याची खात्री करा. मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, शारीरिक अंतर, सकस आणि पौष्टिक अन्नाचे सेवन या सर्व नियमांचे पालन करत रहा.
Be the first to support
Be the first to share
Comment (0)