1. मुलाच्या नकारात्मक स्वभाव ...

मुलाच्या नकारात्मक स्वभावावर मात कशी कराल? ७ मार्ग

All age groups

Sanghajaya Jadhav

3.0M दृश्ये

3 years ago

मुलाच्या नकारात्मक स्वभावावर मात कशी कराल? ७ मार्ग

Only For Pro

blogData?.reviewedBy?.name

Reviewed by expert panel

Dr Shipra Mathur

व्यवहार
सहानुभूती
सामाजिक आणि भावनिक

बऱ्याच लोकांना आपण बोलताना किंवा वर्तुणुकीतून आपणास जाणवते की काही केल्या मनातून नकारात्मक विचार जात नाहीयेत ... काय करावे सांगा. 
प्रौढांप्रमाणेच मुलांमध्येही नकारात्मक विचार ही एक सामान्य समस्या आहे. त्यांना त्यांचे विचार कसे व्यवस्थित करावे हे माहित नाही, म्हणून तुम्ही त्यांना नकारात्मकतेवर मात करण्यास मदत केली पाहिजे. त्यांची भीती, त्यांच्या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही त्यांना कशी मदत करू शकता ते येथे आम्ही सांगत आहोत. 

मुलांना नकारात्मकतेतुन बाहेर काढण्याचे कोणते मार्ग आहेत? 

More Similar Blogs

    १. छंद जोपासा
    छंद आपणास नकारात्मक विचारांपासुन लांब नेण्यास मदत करते. मन एकाग्र असले की मनात नेगेटिव्ह विचार येत नाहीत. आपल्या आवडीचे काम आपणास समाधान ही देऊन जाते.

    २. नियंत्रक आणि निमंत्रक 
    निमंत्रक बनु नका तसेच स्वतःवर भरकटणाऱ्या विचारांवर नियंत्रण ठेवा.  मला अस वाटते की नकारात्मक विचारांना  सर्वस्वी जबाबदार आपणच असतो नियंत्रण आपल्याच हातात असते तसेच त्या नकारात्मक विचारांना खतपाणीही नकळत स्वतःच घालत असतो म्हणून यास निमंत्रक म्हटलं तरी चालेले. म्हणुन मुलांना यात योग्य मार्गदर्शन पालकच करू शकतात. 
     
    ३. भावनांवर नियंत्रण ठेवण्याची सवय लावा 
    त्यांना समजावून सांगा की ते ज्या गोष्टींचा विचार करतात, त्यांना तशाच वाटू लागतील. ते त्यांच्या स्वतःच्या भावना जसे की आनंद, राग, दुःख इत्यादींवर नियंत्रण ठेवू शकतात. प्रत्येकाच्या मनात विचारांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती असते.

    ४. शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम 
    जर तुमच्या मुलाने नकारात्मक विचारांना स्वतःवर वर्चस्व गाजवू दिले तर त्याचा त्याच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. संशोधनात हे देखील सिद्ध झाले आहे की जेव्हा मुले सकारात्मक असतात आणि आनंदी असतात तेव्हा त्यांच्या शरीरात सकारात्मक बदल देखील होतात. त्यांच्या श्वासोच्छवासाची गती योग्य राहते आणि त्यांचा श्वास खोलवर जातो. याशिवाय त्यांच्या स्नायूंचा ताणही कमी असतो.

    त्याच वेळी, जेव्हा त्यांच्या मनात नकारात्मक विचार येतात, तेव्हा त्यांच्या शरीराचे तापमान कमी होऊ लागते, त्यांना घाम येऊ लागतो आणि त्यांचा श्वासोच्छ्वासही वेगवान होतो.

    ५. नकारात्मकतेपासून दूर राहण्यास प्रवृत्त करा
    या नकारात्मकतेतून कसे बाहेर पडायचे हे त्यांना कळत नसेल, तर ते जगाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहू लागतात. त्यांना असे वाटू शकते की त्यांना कोणीही पसंत करत नाही आणि त्यांच्यासोबत वाईट गोष्टी घडतील.

    त्यांना शिकवा की जेव्हा जेव्हा त्यांना भीती वाटते किंवा वाईट वाटते तेव्हा त्यांनी स्वतःला विचारले पाहिजे की ते काय विचार करत आहेत आणि खरोखर काळजी करण्यासारखी गोष्ट आहे का? बर्‍याच गोष्टी खरोखर तितक्या गंभीर नसतात जितक्या ते त्यांच्या मनात विचार करत असतात.

    ६. आत्मपरीक्षणाची सवय लावा
    मुलांना हे आत्मनिरीक्षण कसे करावे हे स्वतःला कळत नाही, म्हणून तुम्ही त्यांना ही कला शिकवली पाहिजे, याद्वारे ते भविष्यात एक चांगली व्यक्ती बनतील.

    त्यांच्या समस्यांमध्ये तुम्ही त्यांच्यासोबत आहात आणि ते तुमच्याशी प्रत्येक समस्येवर बोलू शकतात, अशी भावना त्यांना नेहमी द्या. तुम्ही त्यांच्या समस्या कधीच नाकारू नका.

    ७. तुमच्या आयुष्यातही सकारात्मकता आणा
    तुमच्या मुलाला कधीही सांगू नका की त्याच्या वायफळ बडबड किंवा बोलण्यामुळे अस्वस्थ होत आहेत. असे आपसुकच घडते की ते त्यांच्या समस्या आपल्याशी सामायिक करण्यास ते घाबरतात, जेव्हा त्यांना त्यांच्या भीतीशी स्वतःहून कसे लढायचे हे माहित असते तेव्हा त्यांना अचानक मोठे झाल्या सारखे वाटते. त्यांना ही कला शिकवायची आहे.

    तुम्ही कसे विचार करता त्यावर तुम्हाला कसे वाटते याचा परिणाम नेहमीच होत असतो. हे फक्त मुलाला शिकवू नका, तर हे तंत्र तुमच्या आयुष्यात देखील लागू करा. तुम्हाला सकारात्मक पाहताना तुमच्या मुलामध्येही सकारात्मकता येते.

    वर नमूद केलेल्या गोष्टींचे पालन करा आणि तुमच्या मुलांनाही तसे करण्यास प्रवृत्त करा. मग तुमच्या मुलामध्ये काय बदल होतात ते पहा. सकारात्मक व्हा आणि सकारात्मकता पसरवा.

    तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.

    Be the first to support

    Be the first to share

    support-icon
    Support
    bookmark-icon
    Bookmark
    share-icon
    Share

    Comment (0)

    When is a Child ready for a Pet?

    When is a Child ready for a Pet?


    All age groups
    |
    2.3M दृश्ये
    Celebrating Independence at 65

    Celebrating Independence at 65


    All age groups
    |
    11.5M दृश्ये
    Raksha Bandhan - The Knot Of Love!

    Raksha Bandhan - The Knot Of Love!


    All age groups
    |
    2.3M दृश्ये