महाराष्ट्रात अतिवृष्टी!! ...
मुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आज पुण्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे तसेच नाशकात ही शाळा बंद ठेवण्यात आली होती. महाराष्ट्रात विविध भागात संततधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे अनेक जिल्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. एनडीआरएफची एक टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. पूरग्रस्त पट्ट्यात नागरिकाने स्थलांतर करावे आणि सुरक्षित ठिकाणी स्वतःला हलवावे असे प्रशासनाने आदेश दिले आहे. या आपत्तीजनक काळात सर्वात जास्त नुकसान किंवा प्रभाव हा गर्भवती महिला आणि लहानग्यांना होतो त्याच्यावर अतिरिक्त लक्ष ठेवणे गरजेचं आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी चा इशारा देण्यात आला आहे. पूर, वादळे, ढगफुटी या सगळ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागत आहे. यात नाशिक जिल्ह्यास सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बाधित होणारी गावाची नावे
गंगापूर धरण - जलालपूर, नाशिक, नांदूूर, मानूर, पंचाळे, ओढा, आनंदवली, गोवर्धन, गंगापूर, नाशिक, दसक-पंचक, एकलहरे, गंगापाडळी, कालवी, सावळी, दारणासांगवी, गोंडेगाव, कोठुरे, गंगावाडी, चांदोरी, सायखेडा, सिंगवे, करंजगाव, काथरगाव, चेहेडी, वऱ्हेदारणा, लालपाडी, शिंपीटाकळी, चाटोरी, मांजरगाव, चापडगाव, करंजगाव.
दारणा धरण - बगूर, संसरी, बेलतगव्हाण, चेहेडी, चाडेगाव, सामानगाव, कोटमगाव, दारणासांगवी, साकूर, शेणीत, बेलू, राहुरी, दोनवाडे, मनेगाव, शेवगेदारणा, पळसे, बाभळेश्वर, जाखोरी, जोगलटेंभी.
कडवा धरण - पिंपळगाव डुकरा, शेणीत, पिंपळगाव घडगा, बेलू.
वालदेवी धरण - आंबेबहुला, गौळाणे, देवळाली.
आपत्ती म्हणजे काय?
आपत्ती म्हणजे आकस्मिक आलेले संकट. यात मोठय़ा प्रमाणत जीवित आणि वित्तहानी होते. प्राथमिक शाळेतील मुलं (विषेशत: ५- १२ वयोगटातील) आपत्तीच्या काळात दुर्बल असतात. याच्यावर लक्ष केद्रित करणं गरजेच असते.
गर्भवती महिला आणि लहान मुलांना पूर दरम्यान सर्वाधिक समस्या भेडसावतात.
आज या ब्लॉगमध्ये आम्ही सांगणार आहोत की आपत्तीसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आपण स्वतःची आणि आपल्या मुलांची काळजी कशी घेऊ शकता. पूर आपल्याबरोबर बर्याच त्रास घेऊन येतो, म्हणून आपण अगोदर सावध असणे आवश्यक आहे. पुराच्या धोक्याचा अंदाज घेऊन आपण आगाऊ काही आवश्यक व्यवस्था केल्यास ते आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षेसाठी चांगले होईल. पॅरेंट्यून सूचित करतो की पूर जन्य परिस्थितीत काय करावे आणि कोणती पावलं उचलणं अपेक्षित आहे.
आपत्कालीन किटमध्ये काय असावे
जर आपण पूरग्रस्त भागात राहत असाल तर आपण आपल्या कुटुंब आणि मुलाच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन किट तयार केले पाहिजे.
या गोष्टीही लक्षात ठेवा एनडीएमए म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या या सूचनांचे अनुसरण करा. पुरासारख्या आपत्तीच्या वेळी, ऐकलेल्या अफवा किंवा अफवांकडे लक्ष देऊ नका. आपल्या स्वत: च्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी एनडीएमएने दिलेल्या या सूचना आपल्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतात.
१. प्राथमिक आरोग्य केंद्र कुठे आहे कसे जायचे याची माहिती ठेवा आणि इतर समर्थन साइट जाणून घ्या
२. रेडिओ आणि टीव्हीवरील बातम्या ऐकल्यामुळे आपत्तीच्या परिणामाचा प्रभाव कसा याचा अचूक अंदाज येतो
३. मुलांना पूर पाण्यापासून दूर ठेवा कारण त्यात प्राणघातक जंतू असतात ज्यामुळे अनेक रोगास कारणीभूत असतात.
४. पुराच्या काळात शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थेच्या संपर्कात राहिल्यास जीवितहानीचे नुकसान कमी होऊ शकते.
५. पिण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी फक्त स्वच्छ पाणी वापरा.
६. स्थानिक पाण्यात क्लोरीनच्या गोळ्या घाला.
७. आवश्यक वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेव.
८. प्रशासनांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा.
९. वेळो वेळी स्वतःला इतरांना प्रोत्साहित करा.
१०. मदतीसाठी तत्पर रहा.
मी आशा करते की आपण सर्वजण सुरक्षित राहू आणि आपल्यावर अशी आपत्ती कधीही येऊ नये , परंतु जर कधी आलीस तर हा ब्लॉग आपल्यासाठी संजीवनी सारखे कार्य करेल. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. ब्लॉगमध्ये नमूद केलेल्या उपायांचे अनुसरण करण्यापूर्वीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा.
Be the first to support
Be the first to share
Comment (0)