ऑटिज्म मुलांचे केस कापतान ...
Only For Pro
Reviewed by expert panel
मूल जेव्हा ऑटिस्टीक असते तेव्हा ते अतिसंवेदशील असते त्याच्या विविध सवेंदनशीलता जागृत असतात जसे मोठयाने आवाज झाल्यावर कानावर हात ठेवणे एकच गोष्ट वारंवार करणे.
यात आशा मुलाचे केस कापणे एक अग्निदिव्य असते. त्यांना पार्लर मध्ये नेण्या पासून ते केस कापे पर्यंत पालकांची तारांबळ उडते आशा मुलांच्या दैनंदिन कामात ग्रूमिंग खूप महत्त्वाचे असते, ज्यामध्ये केस कापण्याचाही समावेश असतो. हे काम करताना ही मुले खूप अस्वस्थ होतात. ही समस्या टाळण्यासाठी जाणून घेऊया काही खास टिप्स.
१) त्याचे मन दुसरीकडे वळवा
बर्याचदा केस कापण्याची भीती मनात वाटते आणि ते उगाचच इकडेतिकडे फिरत राहतात. अशा परिस्थितीत, तो जास्त हालचाल करणार नाही याची काळजी घेतली पाहिजे कारण यामुळे त्याला दुखापत होऊ शकते. यासाठी तुम्ही अशा काही गोष्टी त्याच्यासमोर ठेवा, ज्या तो शांतपणे पाहू शकेल. तथापि, आजकाल काही सलूनमध्ये, बाळाच्या समोर अशी स्क्रीन असते जी ते शांतपणे पाहतात. त्यामुळे मुले हलत नाहीत आणि केसही व्यवस्थित कापु देतात.
२) एक्सपर्ट कळुन केस कापा
आशा मुलांचे केस कापण्यासाठी, मुलांचे केस कापण्याचा अनुभव असलेल्या व्यक्तीचीच निवड करा. कारण नवीन व्यक्ती बाळाला इजा करू शकते. याशिवाय केस कापण्यासाठी जी उपकरणे वापरली जात आहेत ती स्वच्छ आहेत की नाही, या गोष्टी लक्षात ठेवा. काही वेळा घाणीमुळे बाळाला संसर्गही होऊ शकतो.
३) वातावरण शांत ठेवा
केस कापताना मुले रडतात आणि संपूर्ण घर डोक्यावर घेतात यात शंका नाही. अशा परिस्थितीत, संपूर्ण कुटुंबाने त्याला शांत करण्यासाठी एकत्र येऊ नये, कारण शांत राहण्याऐवजी तो अधिक चिंताग्रस्त होईल किंवा लाडाला येईल. मुलांचे केस कापताना जमू नका आणि आजूबाजूचे वातावरण शांत ठेवा.
४) बाळाला खुर्चीऐवजी तुमच्या मांडीवर ठेवा
मुलांना त्यांच्या आईच्या कुशीत सर्वात जास्त सुरक्षित वाटते. अशा परिस्थितीत प्रयत्न करा की जेव्हा त्याचे केस कापले जात असतील तेव्हा तो तुमच्या मांडीवर असावा.
५) आवडती खेळणी आणि टॉफी सोबत ठेवा
लहान मुलं काही गोष्टींशी खूप जोडलेली असतात, त्या ठेवल्यावर त्यांना जास्त आनंद होतो. यासोबतच तुम्ही त्यांच्यासाठी काही खाण्यापिण्याचेही ठेवावे जेणेकरून ते रडतील तेव्हा तुम्ही त्यांना शांत करू शकाल.
तुम्ही हे उपाय करून पाहिल्यास तुमच्या मुलालाही केस कापण्याचा आनंद घेता येईल आणि तुमच्या समस्या सहज सुटू शकतात.
तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.
Be the first to support
Be the first to share
Comment (0)