पुण्यात H3N2 विषाणूचा कहर ...
महाराष्ट्रात पुण्यनगरीत आजकाल H3N2 विषाणू चा कहर पहावयास मिळत आहे. यात १ ते ५ वयोगटातील लहानग्यांना संसर्ग जास्त दिसतो त्यामुळे शहरातील रुग्णालयांमध्ये रुग्णाची भरती दिसून येत आहे. H3N2 यात श्वास घ्यायला मुलांना त्रास होतो याची काही नमुने घेतल्या गेले त्यात हे नमुने गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम (SARI) ची लक्षणे आहेत जे जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांचे आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून हॉस्पिटलमध्ये दररोज ४-५ रुग्ण दाखल होत आहेत. यापैकी बहुतेकांना H3N2 ची लागण झाली आहे.
H3N2 विषाणू : पालक वर्ग आपल्या पाल्यासाठी काय खबरदारी घेऊ शकता?
मी तुम्हाला काही दैनंदिन पद्धती आहेत ज्या तुमच्या मुलामध्ये या विषाणूचा प्रसार कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात त्या तुमच्या सोबत शेअर करत आहे ज्या तुम्ही त्याच्या अगवळणी पाडून घेऊ शकता जेणे करून तो या H3N2 सारख्या संसर्गजण्य रोगाशी दोन हात करेल.
१. हात धुणे - हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
२. खोकल्यावर, शिंकल्यानंतर किंवा साबण आणि पाण्याने नाक पुसल्यानंतर हात धुवा
आपण आपल्या मुलाचे नाक पुसल्यानंतर आपले स्वतःचे हात धुवा
३. एकापेक्षा जास्त व्यक्तींनी एकच टिश्यू किंवा रुमाल वापरणे टाळा
४. मुलांनी तोंडात घातलेली खेळणी सामायिक करणे टाळा आणि त्यांची योग्य स्वच्छता राखा
५. कपडे आणि टॉवेल व्यवस्थित धुतल्याशिवाय सामायिक करणे टाळा. हे सर्व खबरदारी उपाय तुम्ही आजमावा!
खबरदारी उपाय योजना
सद्या सर्दी,पडसे ही लक्षणे सर्व ठिकाणी बघावयास मिळत आहे, म्हणून तुम्ही खबरदारी उपाय योजना करणे गरजेचं आहे जसे शाळेत मुलाला शिकताना दोन्ही हाताच्या मध्ये काळजी पूर्वक शिकण्याची सवय लावा तसेच टिफीन शेअर करू नकोस असा सल्ला द्या आणि तुम्हाला वेळेवर लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपायांचे महत्त्व माहित आहे. जेव्हा जेव्हा तुमचे मूल गर्दीच्या ठिकाणी असते तेव्हा तिने/त्याने मास्क घातला असल्याची खात्री करा. निरोगी खाणे आणि मूलभूत स्वच्छतेचे पालन करून आपल्या मुलाची चांगली काळजी घ्या.
काही उत्कृष्ट रोगप्रतिकारक बूस्टर आहेत:
इत्यादी सवयी तुमच्या मुलाला विषाणूशी प्रतिकार करायला सुसज्ज करतील. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवून आपण दररोज संसर्गजन्य रोगाशी लढू शकता.
Be the first to support
Be the first to share
Comment (0)