पालकहो याकडे लक्ष द्या: न ...
Only For Pro
Reviewed by expert panel
भारतीय समाजात अजूनही लैंगिक संबंधांशी संबंधित माहितीवर चर्चा करणे आवडत नाही, म्हणूनच मुलांकडे याबद्दल अनेक दिशाभूल करणारी माहिती आहे. यामुळे वाईट चालीरीती आस्तित्वात येत असतात. निरोध चा वापर कुटुंब नियोजन तसेच नको असलेल्या गर्भधारणेसाठी केला जातो. लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी जगभरात कुटुंब नियोजनाची साधने म्हणून वापरण्यात येतो. महिलांचे कंडोमही बाजारात उपलब्ध आहेत, मात्र महिला बहुतांशी गर्भनिरोधक गोळ्या वापरतात.
निरोधचा वापर गर्भधारणा रोखण्यासाठी तसेच लैंगिक आजारापासून बचाव व्हावा हाच उद्देश आहे. मात्र पश्चिम बंगालमधील दुर्गापूर या भागातील काही विद्यार्थी कंडोमचा वापर नशा करण्यासाठी करत असल्याचे समोर आले आहे. याच कारणामुळे दुर्गापूरमधील शहरातील अनेक भागांमध्ये फ्लेवर्ड कंडोमची विक्री आश्चर्यकारकपणे वाढली. अचानक वाढलेल्या कंडोमच्या विक्रीमुळे दुकानदारही अचंबित होते. अचानक खप वाढल्याने दुकानदार ही बुचकड्यात पडले , एका दुकानदाराने तर याबाबत खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणाकडे विचारणाही केली होती. मात्र त्यावर तरुणाने उत्तर देण्याचे टाळले.
खोलवर माहिती घेतल्या नंतर कळले की कंडोमची मागणी नशेसाठी केली जात आहे, वितरका कडे अतिरिक्त कंडोमची मागणी वाढल्याने, या परिसरातील दुकानांमध्ये कंडोमची कमतरता भासू लागली आहे. नशेसाठी तरुणांमध्ये फ्लेवर्ड कंडोमची मागणी वाढू लागल्याने यंत्रणा चिंतेत आहे.
दुकानदारांनी सांगितले की नशा करणारे तरुण या कंडोमचा उपयोग वाफ घेण्यासाठी करतात. अनेक जण इतर नशा करण्याऐवजी आता कंडोमची वाफ घेऊ लागले असल्याचीही माहिती आहे.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने याबाबतचे एक संशोधन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार कंडोममध्ये एरोमॅटिक कम्पाऊंड असतात, हे कम्पाऊंड विरघळल्यानंतर त्याचे रुपांतर अल्कोहोलमध्ये होते. त्यामुळे त्याचे व्यसन लागण्याची शक्यता असते.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने याच जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, जर कंडोमला बराच काळ पाण्यात उकळत ठेवले तर त्याच्यातील अल्कोहोल असणारे द्रव्य हे पाण्यात मिसळते. हे नशा करणारे तरुण अशाच प्रकारे कंडोम उकळून, त्याची वाफ घेत असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तर हे कंडोम उकळलेले पाणीही काही तरुण नशा करण्यासाठी पित असल्याची माहिती आहे. तरुण मुले कंडोम खरेदी करुन ते गरम पाण्यात भिजायला टाकतात त्यानंतर हे पाणी पिऊन ह्या तरुणांकडून नशा केली जात आहे. यामुळे हे तरुण जवळपास १० ते १२ तास नशेत राहतात असे सांगण्यात येत आहे. हे नशा करणारे तरुण अशाच प्रकारे कंडोम उकळून, त्याची वाफ घेत असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तसेच आरई कॉलेज मॉडेल स्कूलचे रसायनशास्त्राचे शिक्षक नुरुल हक यांनी कंडोमच्या मदतीने केल्या जाणाऱ्या नशेबाबत सविस्तर सांगितले आहे. ” गरम पाण्यात भिजवत ठेवल्यामुळे कंडोमधील ऑरगॅनिक मॉल्यूक्यूल्स तुटतात. त्यातून अल्कोहोल तयार होते. याच रसायनाचा तरुण नशा म्हणून वापर करतात,”
१. लेटेक्स, प्लास्टिक कंडोम (Latex, Plastic Condom) - बहुतेक लोक लेटेक्स कंडोम वापरतात.
२. ल्युब्रिकेटेड कंडोम (Lubricated Condom) – लुब्रिकेटेड कंडोममध्ये लिक्विडचा पातळ थर असतो जो लुब्रिकेशनमध्ये वापरला जातो. हे लैंगिक संभोगादरम्यान कोणत्याही प्रकारचे इरिटेशन किंवा वेदना प्रतिबंधित करते.
३. स्पर्मिसाइड कोटेड कंडोम (Spermicide Coated Condom) - या कंडोममध्ये नॉनॉक्सिनॉल-९ नावाचे रसायन असते. हे शुक्राणू नष्ट करते. कंडोममधील शुक्राणू नाशकाच्या प्रमाणात फारसा फरक नसला तरी त्याचा वापर गर्भधारणेचा धोका कमी करतो.
तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.
Be the first to support
Be the first to share
Comment (0)