महाराष्ट्रात शाळा प्रवेश ...
महाराष्ट्रात अनेक शाळा खोटी मुलाची पटसंख्या दाखवून सरकारी अनुदान मिळवत आहेत आणि मुलांची शाळेतील संख्या नाममात्र किंवा तेही नसते हे टाळण्यासाठी आता राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे शाळेत प्रवेश घेताना आता विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांचं आधार कार्ड देखील लिंक केलं जाणार आहे.
राज्यात विविध ठिकाणच्या शाळेत विद्यार्थ्यांची बोगस उपस्थिती दाखवून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले जात होते. हा गैर प्रकारस टाप लावण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांनाही आता आधार सक्ती करण्यात आली आहे. यामुळे मुलांच्या बोगस प्रवेशाला चाप बसणार आहे.
बीड जिल्ह्यातील बोगस विद्यार्थी पटसंख्या घोटाळा उघडकीस आल्यावर राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती पी व्ही हरदास यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीचा अहवाल स्वीकारून राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाबाबत नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत आणि राज्य सरकारला या पुढे आर्थिक फटका बसू नये या साठी हा निर्णय घेतला असून आता शाळा प्रवेशासाठी मुलांबरोबर पालकांचे आधार कार्ड देखील बंधनकारक राहणार आहे.
या नव्या नियमानुसार बोगस पटसंख्या शोधण्यासाठी शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख यांनी वर्षांतून दोन वेळा शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांची पटपडताळणी करावी. या पडताळणीत काही विसंगती आढळल्यास त्यांनी एक महिन्यात सखोल चौकशी करावी आणि त्यात दोषी आढळणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा असे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी करताना सबंधित शैक्षणिक संस्थेची आवश्यक नोंदवही आणि कागदपत्रे जप्त करण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
अनियमितता आढळून आलेल्या शैक्षणिक संस्थांचे अनुदान परत घेण्याबाबत किंवा अनुदान थांबवण्याबाबत तसेच शाळेची मान्यता काढून घेण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांनी संचालकांमार्फत तत्काळ शासनास सादर केला जाणार आहे. एखाद्या पालकाने आधार कार्ड दिले नाही तर मुलाचा प्रवेश रद्द करण्याचे अधिकार आता शाळांना मिळणार आहे.
Be the first to support
Be the first to share
Comment (0)