10 गोष्टी ज्या कोणीही तु ...
Only For Pro
Reviewed by expert panel
गर्भधारणेचा शेवटचा टप्पा म्हणजे बर्थिंग, आणि हे एकदम अनोखं अनुभव असतं. इंटरनेटवर खूप साऱ्या टिप्स मिळतील, पण काही गोष्टी फक्त अनुभवानेच कळतात. बर्थिंग म्हणजे केवळ फिजिकल गोष्ट नाही, तर ती मानसिक आणि भावनिक प्रवासाचाही मोठा भाग आहे. ह्या प्रवासात घाबरणं, आनंदी वाटणं, थकवा येणं, सगळंच नॉर्मल आहे. आपल्या शरीरावर विश्वास ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे.
कॉन्ट्रॅक्शनच्या वेळी योग्य ब्रेक घेणं, आराम करणं आणि योग्य पोजिशन निवडणं हे खूप उपयोगी ठरतं. प्रत्येक बर्थिंग स्टोरी वेगळी असते, त्यामुळे दुसऱ्यांशी तुलना करून स्ट्रेस घेण्याची गरज नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, प्लॅननुसार सगळं झालं नाही तरी, तो तुमचा अनोखा अनुभवच राहणार आहे. बर्थिंगनंतर स्वतःची काळजी घेणं आणि मदत मागणं यात काहीही चुकीचं नाही. हा एक सुंदर आणि संस्मरणीय प्रवास आहे, जो तुम्हाला नवी ताकद देईल!
1. तुमचं शरीर तुम्हाला सगळं शिकवेल!
तुम्हाला वाटत असेल की "मी तयार आहे का?" पण तुमचं शरीर हळूहळू सिग्नल्स देतं. लेबर पेन सुरू झाल्यावर तुमच्या बॉडीचं नैसर्गिक इंट्यूशन तुम्हाला बरोबर गाइड करेल. म्हणून स्वतःवर विश्वास ठेव!
2. घाबरणं नॉर्मल आहे, पण त्याचा अर्थ तुम्ही तयार नाहीस असं नाही!
लेबर सुरू होण्याआधी भीती वाटणं एकदम सामान्य आहे. हे एक मोठं आणि अविस्मरणीय क्षण आहे. पण भीतीचा अर्थ असा नाही की तुम्ही तयार नाहीत ! उलट, तुमचं मन आणि शरीर तुम्हाला यासाठीच तयार करत असतं.
3. प्रत्येक बर्थिंग स्टोरी वेगळी असते - तुम्हालाच फॉलो करायचंय!
काही लोक 3 तासांत डिलिव्हरी करतात, काहींना 24 तास लागतात. काहींना सिझेरियन होतं, काहींना नॉर्मल डिलिव्हरी. तुला दुसऱ्यांच्या अनुभवाशी तुलना करायची नाही. तुझी स्टोरी, तुझा प्रवास!
4. रडू आलं तरी हरकत नाही - हा क्षण तुझं आयुष्य बदलणारा आहे!
बर्थिंग इमोशनल रोलरकोस्टर आहे. वेदना, थकवा, आनंद आणि जबाबदारी यांचं हे कॉम्बो पॅक असतं. तुम्हाला रडू आलं तर लाजू नका, उलट ते तुमच्या मनातलं भार हलकं करेल.
5. तुमचं बेबी तुमच्या फीलिंग्स फील करतं!
गर्भात असतानाही तुमच्या बेबीला तुमच्या भावना जाणवतात. तुम्ही रिलॅक्स आणि पॉझिटिव्ह राहिलात तर बाळालाही सेफ वाटेल. म्हणून स्ट्रेस नका घेऊ!
6. लेबर फक्त फिजिकल नाही, तो एक मानसिक आणि भावनिक प्रवास आहे!
तुम्हाला असं वाटेल की सगळं फक्त बॉडीसाठी चॅलेंजिंग आहे, पण मन आणि भावना यांनाही मोठा रोल आहे. बर्थिंगसाठी फिजिकल स्टॅमिना जितका लागतो, तितकाच मानसिक बळही लागतं.
7. कॉन्ट्रॅक्शनच्या मध्ये विश्रांती घ्यायला विसरू नका!
कॉन्ट्रॅक्शन म्हणजे फक्त पेन नाही, त्याच्या मध्ये तुझ्या बॉडीला छोट्या ब्रेक्स मिळतात. त्या क्षणांचा उपयोग करून तुम्ही एनर्जीला सेव्ह करू शकता.
8. लेबर पोजिशन तुमच्या सोयीनुसार ठरवा – तो खूप मोठा फरक करू शकते!
सगळे हॉस्पिटल बेडवर झोपून डिलिव्हरी करतात असं नाही! उभं राहून, स्क्वॉटिंग, चौपाटीवर टेकून, किंवा वॉटर बर्थिंगसाठीही पर्याय आहेत. तुम्हाला जो सोयीस्कर वाटेल, तोच सर्वोत्तम!
9. "स्ट्रॉन्ग" राहण्याचा स्ट्रेस घेऊ नका - मदत मागणं ही खरी ताकद आहे!
बर्थिंग आणि पोस्टपार्टम फेज एकटीने पेलणं सोप्पं नाही. तुमचा पार्टनर, आई, सासूबाई, मैत्रिणी किंवा प्रोफेशनल डोला यांच्याकडून मदत घ्यायला अजिबात लाजू नका.
10. बर्थिंग प्लॅन प्रमाणे नाही झालं तरी, तो तुमचा अनोखा प्रवासच राहील!
खूप जण डिलिव्हरीसाठी प्लॅन तयार करतात. पण जर तो प्लॅन बदलला तरी टेन्शन घेऊ नका. हा प्रवास तुमचाच आहे, आणि तो कायमच खास राहणार आहे.
शेवटचं महत्त्वाचं:
डिलिव्हरीनंतर स्वतःची काळजी घेणं तितकंच आवश्यक आहे. जसे बाळाची काळजी घेणे , तसेच स्वतःवरही प्रेम आणि तुमच्या शरीराला रिकव्हर होण्याची वेळ द्या.
तुम्हीही एक्सपीरियन्स शेअर करू शकता! तुम्हाला यापैकी कोणती गोष्ट खूप उपयोगी वाटली? कमेंट करून सांग!
Be the first to support
Be the first to share
Comment (0)