२०२२ बारावी बोर्डाच्या प ...
मागील वर्षी कोविड-१९ महामारीमुळे शाळा वर्षभर बंद राहिल्याने, महाराष्ट्रातील बारावीची परीक्षा २५% कमी अभ्यासक्रमावर घेण्यात आली.
ह्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. महाराष्ट्र बोर्डाने ४ मार्च २०२२ ते ७ एप्रिल २०२२ या कालावधी दरम्यान बारावीची परीक्षा घेतली गेली.आता या परीक्षांचा निकाल लागणार आहे. आज १२ वीचा निकाल लागणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या आज पत्रकार परिषदेत निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. मार्च ते एप्रिल २०२२ दरम्यान घेण्यात आलेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर होईल, असे ट्विट राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी केले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर दुपारी १ वाजता निकाल ऑनलाइन उपलब्ध होतील. त्यानुसार आज म्हणजेच ८ जूनला बारावीचा निकाल लागणार आहे.
परीक्षेसाठी एकूण १४.८५ लाख विद्यार्थ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र भर नोंदणी केली होती, ज्यामध्ये ८.१७ लाख मुले आणि ६.६८ लाख मुली आहेत. मागच्या वर्षी पास होण्याची टक्केवारी चांगली होती. २०२१ मध्ये, सुमारे १२ लाख किंवा ९९.६३ टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
गुणपत्रिका , स्थलांतर प्रमाणपत्र , उत्तीर्ण प्रमाणपत्र , कॉलेज सोडल्याचा दाखला , आधार कार्ड , जातीचा दाखला , रहिवासी दाखला , पासपोर्ट साईझ फोटो
विद्यार्थी १० जून ते २० जून २०२२ या कालावधीत गुण पडताळणीसाठी अर्ज करू शकतात. गुणांच्या पडताळणीसाठी छायाप्रती आवश्यक असतील जी १० जून ते २९ जून २०२२ या कालावधीत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जातील. विद्यार्थ्यांना फोटो कॉपी आणि पडताळणीसाठी ऑनलाइन पैसे द्यावे लागतील.
गुणपत्रिका महाविद्यालयीन तारखे नुसार उपलब्ध करून देण्यात येतील. विद्यार्थी त्यांच्या संबंधित महाविद्यालयातून गुणपत्रिका घेऊ शकतात.
खालील अधिकृत वेबसाइट आहेत ज्यावर निकाल उपलब्ध होतील https://t.co/smigUpoDgw… https://t.co/tgerHiM0ih
— प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड (@VarshaEGaikwad) 1654597556000
महाराष्ट्र बारावीचा निकाल २०२२ बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन प्रसिद्ध केला जाईल - https://mahahsscboard.in/. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.
तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.
Be the first to support
Be the first to share
Comment (0)